कांचन वेल

bauhinia vahlii

मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणारा वेल आहे. कांचन वेलाची पान ही कांचन वृक्षा सारखी असतात, पण वृक्षाच्या पानांन पेक्षा बरीच मोठी असतात. वेलीची पानं वरून गर्द हिरवी व खालच्या बाजूने पांढरट हिरवी, हलकी चंदेरी लव युक्त असतात. पानांच्या कडा लालसर रंगाच्या, देठ चार ते पाच इंच लांब लालसर लवयुक्त असलेले असतात. पानांच्या खालच्या बाजूच्या मुख्य शिरा उठावदार असतात. वृक्षांच्या आधाराने वेल पन्नास ते साठ फूट उंच वाढतो व भरपूर विस्तार होतो. आधार तनाव गोल वेटोळे स्प्रिंगच्या आकाराचे असतात. कवळी पान मिटलेली तांबूस रंगाची भरपूर प्रमाणात चकाकणारी चंदेरी लव असल्यामुळे खूप छान दिसतात. फुल पांढऱ्यारंगाची, आकाराने कांचन वृक्षाच्या फुलांसारखी, उन्हाळ्यात येतात. चपट्या शेंगा आठ ते दहा इंच लांब व एक ते सव्वा इंच रुंद असतात. त्याच्या बिया भाजून खातात. औषधी गुणधर्म असलेला हा वेल आहे. त्याचा नैसर्गिक अधिवास कमी होत चाललेला आहे माहिती नसल्याने त्याची लागवड होत नाही. सरकारी रोपवाटिकांमधून रोप उपलब्ध करत प्रबोधनाची गरज आहे.

identity footer