मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात उष्ण कोरड्या हवामानात वाढणारा वृक्ष. मुरमाड, खडकाळ, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो.चाळीस ते पन्नास फूट उंच वाढतो.दाट पर्णसंभार असलेला वृक्ष. पुर्ण वाढीच्या वृक्षाचे ,खोड सरळ वाढलेले व दहा ते पंधरा फुटा नंतर फांद्यां फुटलेल्या असतात. पान मोठी, दोन भागात,उघडल्यासारखी, टोकाला थोडी खाच असलेली असतात. नवीन पालवी सुरवातीला तांबूस रंगाची असते. पुर्ण वाढीच्या पानांनचा आकार व रंग हवामान व मातीच्या प्रकारानुसार बदलतो. काही ठिकाणी गर्द हिरवी तर काही ठिकाणी हिरवी पान दिसतात. अगदीच अल्प काळासाठी पानगळ होते, काही भागात सदाहरित असतो. वातावरण व जमिनीच्या प्रकारानुसार पानगळीचा कालावधी असतो. पावसाळ्यात इंच भर आकाराच्या, सुंदर रचनेच्या फुलांनी बहरलेले असतो. दाट पर्णसंभार असलेल्या हिरव्या गार पानानच्या आजुबाजुला पांढरट पिवळसर पाकळ्या व पाकळ्यांवर लालसर ठिपके असलेल्या फुलांन मुळे वृक्ष खूपच सुंदर दिसतो. फुल नोव्हेंबर पर्यंत येत असतात. शेंगा हिवाळ्यात येण्यास सुरुवात होते. शेंगा चपट्या जाडसर इंच भर रुंद व चार पाच इंच लांब असतात. लटकलेल्या शेंगा सुरवातीस हिरव्या, नंतर लालसर होतात त्यावेळेस झाड वेगळ्याच दिमाखात असल्या सारखे वाटते. शेंगा मार्च मध्ये परिपक्व होतात.औषधी गुणधर्म असलेला, उपयुक्त, बहरदार वृक्ष,अज्ञाना मुळे वृक्षरोपण करतांना विचारात घेतला जात नाही. मी याचे रोप तयार करून बर्याच ठिकाणी लावली आहेत व याचे बियाणे गोळा करून काही नर्सरीत रोप करण्यासाठी पण दिली आहेत. वृक्ष परिचय केंद्रामध्ये छान वाढलेला आहे. सातपुर येथे एका कंपनीच्या कंपाऊंड लगत पण चांगला वाढलेला हा वृक्ष आहे.