सदाहरित वृक्ष, मध्यम व जास्त पाऊस पडणाऱ्या भागात आढळतो. सुपीक व पाण्याचा स्तर चांगल्या असलेल्या जमिनीत ह्याची वाढ जोमाने होते.गर्द हिरव्यागार , चकचकीत पानांनचा, मध्यम उंचीचा, दाट पर्णसंभार असलेला भारदस्त वृक्ष. पानांन वरच्या शिरा लांबुन च लक्षात येतात. पानावरच्या शिरांमुळे ह्याला वेगळे च सौंदर्य प्राप्त झाले आहे. फुलण्याचा हंगाम पावसाळ्यात असतो. छोट्या फुलांचे तुरे पानांन च्या आड असतात. नीट बघितल्या शिवाय उमलेली आहेत की नाही, हे लक्षात येत नाही. पण फळ मात्र एकदम फुलांच्या विरुध्द ठसठशीत लगडलेले पटकन लक्षात येणार.फळांन मुळे रक्तरोहिड्या च्या वृक्षाच वेगळच सौंदर्य दिसते. फेब्रुवारी मार्चमध्ये पुर्ण वाढलेली लिंबासारखी दिसणारी पिवळी लगडलेली फळ दिसु लागतात. तिन भागात उकलेली पिवळी फळ, व त्यातुन डोकवणाऱ्या भडक नारंगी रंगाच्या तिन बिया लक्ष वेधून घेतात. नारंगी आवरणाच्या आत गर्द चाॅकलेटी रंगाची बि असते. बी पासुन काढलेलं तेल हे आमवातात माॅलिशसाठी वापरतात. औषधी गुणधर्म असलेला हा वृक्ष आहे. योग्य ठिकाणी याची लागवड केल्यास परिसराचे सौंदर्य, वाढवण्यास नक्कीच मदत होईल.