शिरीष

albizia lebbeck

कमी, मध्यम पावसाच्या ठिकाणी वाढणारा. मुरमाड, दगडधोंड्यांची हलक्या प्रतीच्या जमिनीत, उष्ण कोरड्या हवामानात वाढतो. उंच पन्नास ते साठ फूट वाढणारा व विशाल ,डेरेदार पर्णसंभार असलेला हा वृक्ष. खोड सरळ आठ दहा फूट उंच वाढते, साल खडबडीत, तपकिरी करड्या रंगाची असते. फांद्यांचा विस्तार आठ दहा फूटापासुन सुरू होतो. पान लांब असतात. पर्णिकांच्या आठ ते नऊ जोड्या असतात. पर्णिका अगदीच छोटा देठ असलेल्या लांबट गोलाकार असतात. पर्णिका वरतुन गर्द हिरवी व खालच्या बाजूने फिकट हिरव्या असतात. पानगळ हिवाळ्यात साधारण जानेवारी होते. उन्हाळ्याच्या सुरवातीला नवीन पालवी फुटते. नव्या पालवी बरोबरच फुलांचा हंगाम सुरू होतो. हिरवट,पांढरा रंगाची सुगंधी फुले असतात. फुलांचा हंगाम दीड दोन महिने असतो. पुंकेसरांन च्या झुपक्या मुळे फुलांच्या पाकळ्या नीट बघीतल्या शिवाय लक्षात येत नाही. असंख्य पुंकेसरांन च्या रचनेमुळे फुल लक्ष वेधून घेतात. हिरव्या चपट्या शेंगा साधारण आठ नऊ इंच लांब व दीड इंच रुंद,बि असलेल्या ठिकाणी थोड्या फुगीर असतात. हिरव्या शेंगा पानांनच्या गर्दी मुळे चटकण लक्षात येत नाही. हिवाळ्यात शेंगा पक्व झाल्यावर फिकट पिवळसर रंगाच्या होतात, त्यावेळी झाडावर ऊठुन दिसतात. शेंगा जानेवारी फेब्रुवारीत परिपक्व होतात.औषधी गुणधर्म असलेला हा वृक्ष आहे. वृक्ष लागवड करताना पर्यावरण संतुलनासाठी व मातीची धूप थांबवण्यासाठी याची ‌लागवड करणे फायदेशीर ठरेल.

identity footer