रतनगुंज / थोरला गुंज

adenanthera pavonina

बाभूळ कुळातील, कमी,मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत उष्ण, कोरड्या, हवामानात वाढणारा मध्यम आकाराचा वृक्ष. खोड गडद तपकिरी रंगाचे, सरळ असते. गाभ्याचे लाकुड लालसर रंगाचे असते. भरपूर फांद्या असल्याने पर्णसंभार दाट असतो. पान एक आड एक, द्विसंयुक्त पद्धतीचे असतात. पानं दहा ते बारा इंच लांब, असलेली. पर्णिका २ ते ३ सेंटीमीटर लांब व १ सेंटीमीटर रुंद असतात. पानांच्या बगलेत पिवळसर, सुवासिक, छोट्या फुलांचे तुरे उन्हाळ्यात येतात. शेंगवर्गीय फळ असतात. हिरव्या शेंगांचे घोस पावसाळ्यात झाडावर दिसु लागतात. शेंगा सहा ते दहा इंच लांब, एक ते दोन सेंटीमीटर रुंद, चपट्या असतात. परिपक्व झाल्यावर शेंगा तपकिरी रंगाच्या होतात. परिपक्व शेंगा वाळल्यावर वेड्यावाकड्या पिळदार होऊन दोन भागात उकलतात. शेंगांचा आतिल भाग पिवळसर सोनेरी असतो. उकललेल्या शेंगातून लाल रंगाच्या बिया पडतात. बिया गुंजा सारख्याच पण थोड्या मोठ्या, लाल रंगाच्या, चकचकीत असतात. बियांच्या आकारा मुळे त्याला थोरला गुंज म्हणतात. ह्या बियांचा दागिने बनविण्यासाठी उपयोग करतात. ह्या बियांचा रंग पोवळा या रत्नासारखा असल्या कारणाने, रतनगुंज म्हटले जाते. शोभीवतं वृक्ष म्हणून लागवड करण्यासाठी उपयुक्त.

identity footer